Support Our National and Inter National weight Lifter | Milaap
Support Our National and Inter National weight Lifter Nishikant Patil
  • PB

    Created by

    Poonam Bisht
  • NR

    This fundraiser will benefit

    Nishikant Rajendra Patil

    from Kalyan, Maharashtra

आपल्या देशाला अमुक एका क्रीडा स्पर्धेत मेडल्स का नाही मिळत? आपल्याकडे खेळाडूना पाठिंबा का मिळतं नाही, यावर फक्त चर्चा होतात. त्याची खरी पण निराशाजनक बाजू हीच आहे की, आपल्याकडे स्पोर्ट्स वर फक्त बायोपिक सिनेमे चालतात, तेवढाच उत्साह आणि प्रेम आपण वर्तमानात जिवाचं रान करून नॅशनल आणि इंटर नॅशनल स्तरावर आपल्या देशाचं आणि राज्याचं नावलौकिक मिळवण्याचं प्रयत्न करणाऱ्या खेळाडूना दाखवला तर , आपलं क्रीडा क्षेत्रातील चित्र काही वेगळच असेल.

गेल्यावर्षी माझं नॅशनल स्तरावर असणाऱ्या एका स्पर्धेत गोल्डन मेडल हुकल. आणि त्याच कारण इतकंच होत की, स्पर्धेच्या दोन महिन्यांआधी हातात पैसे नसल्याने माझ्या सप्लीमेंटस बंद झाल्या होत्या. एका वेट लिफ्टरसाठी सप्लीमेंटस म्हणजे त्याच सर्वांगीण पोषण करणारी गोष्ट.

माझं नाव निशिकांत रविंद्र पाटील, मी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलोय. मी सध्या माझ्या आई बाबा आणि लहान बहिणीसोबत कल्याणला राहतो. मी एक नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावरचा वेट लीफ्टर आहे. गेले सात वर्षे वेट लिफ्टींगच प्रशिक्षण घेऊन, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो. त्याचसोबत कंप्युटर सायन्स या विषयात मी पदवीधर आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मी जिम ट्रेनर म्हणून पार्ट टाईम जॉब करतोय.

कोविड काळात काही काम नसल्याने , माझ्याजवळ जे काही थोडे पैसे जमवले होते, ते सगळे पैसे घरखर्च आणि शेतीच्या कामासाठी  खर्च झाले. येत्या काही महिन्यात दोन नॅशनल स्पर्धा होणार आहेत, त्यासाठी मी तयारी करीत आहे. आणि माझ्या एका महिन्याचा खर्च १५ हजार रुपये आहे. माझी आर्थिक परिस्थिती सध्या खूप बिकट आहे, पण मी पुढे येण्यासाठी प्रयत्न करतोय. मी तुम्हाला माझ्याकडून एक कळकळीची विनंती करतो, तुम्हाला जमेल तशी मदत मला करा.

कारण मला पुढे जाऊन आपल्या देशाचं नाव जगातल्या वेट लिफ्टींगच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये कोरायच आहे. त्याही पेक्षा जास्त मला या परिस्थितीवर मात करून आपल्या पुढे यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला मदत कराल, अशी मला खात्री आहे.
मला मदत करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

धन्यवाद!

आपला निशिकांत.

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support