हवामान बदल आणि हवामान साक्षरता यावरील जागरूकता अभियान.. | Milaap
हवामान बदल आणि हवामान साक्षरता यावरील जागरूकता अभियान..
1%
Raised
Rs.222
of Rs.10,00,000
1 supporter
 • RR

  Created by

  Rahul Ramesh Patil
 • U

  This fundraiser will benefit

  Underprivileged

  from Sangli, Maharashtra

Storyजागतिक तापमानवाढ,हवामान बदल व हवामानावरील जागरूकता कार्यक्रमासाठी मदत म्हणून निधी संकलन अभियान..

आमची नम्र विनंती आहे की समाजातील जागरूक आणि उदार लोकांनी "हवामान साक्षरता" मोहिमेला पुढील महत्त्वाच्या टप्प्यावर नेण्यासाठी उदारपणे मदत करावी..

नमस्कार,
आमचे नाव "राहुल रमेश पाटील" आहे.
आम्ही अंकली, तालुका मिरज,जिल्हा सांगली महाराष्ट्र येथे राहतो.

आम्ही "हवामान साक्षरता अभियान या लोकचळवळीचे मुख्य प्रबंधक आहोत.

"भारतीय हवामानशास्त्र" या समुहाचे आम्ही संस्थापक असून या समुहाव्दारे आम्ही "हवामान साक्षरता" ही लोकचळवळ उभी केली आहे.

"हवामान साक्षरता" संकल्पना म्हणजे भारतीय उपखंडात राहताना हवामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे..हे ओळखून महाराष्ट्रातील सर्व शेतकरऱ्यांना व सामान्य नागरिकांना हवामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांमध्ये जागतिक तापमानवाढ व बदलत्या हवामानाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे हा होय.

गेली 6-7 वर्षे हा उपक्रम आम्ही अव्याहतपणे चालवत असून या संकल्पनेचा आज या घडीला महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी व नागरिकांना फायदा होत आहे.

पुढील येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आमच्या सारख्या १ लाख हवामान साक्षर व हवामान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांची "फौज" उभी करायची आहे आम्हाला....हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही अविरतपणे मार्गक्रमण करत आहोत..

यासाठी आम्ही सर्व सोशल मीडिया साधनाचा‌..जसे कि फेसबुक,व्हाटस् ॲप,वेब पेज,यु ट्युब चॅनल
तसेच... रेडिओ केंद्र, टिव्ही चॅनल व इतर लिखीत स्वरुपात(प्रिंट मिडिया) उपलब्ध माध्यमांचा वापर करतो...

हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण सुद्धा या अभियानात सर्व माध्यमातून सहकार्य करावे अशी माफक अपेक्षा आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या चळवळीत सामील करून घ्यावे.

जेणेकरून ही चळवळ खुप व्यापक होऊन जागतिक पातळीवर याची दखल घ्यावी लागेल.

त्यामुळे शासन व धोरणकर्ते यांना जाग येऊन येथून पुढे हवामान अंदाज सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत सरकारी व खासगी यंत्रणेकडून उपलब्ध होतील.

हवामाना संबंधित सखोल माहिती असेल तर आपण येणाऱ्या संकटाला तोंड देऊन नुकसान पातळी कमी करू शकतो.

अधिक माहितीसाठी हवामान साक्षरता अभियानाच्या अधिकृत वेबसाईट व फेसबुक ग्रुपला भेट द्यावी हि विनंती.

www.weatherliteracyforum.com

https://www.facebook.com/groups/140626719971530/?ref=share


English..


It is our humble request that the conscious and generous people of the society should extend generous help to take the Climate Literacy Campaign to the next important stage.

Hello,

My name is "Rahul Ramesh Patil". I live in Ankli, District Sangli, Maharashtra.

I am the founder of the group "Indian Meteorology" and through this group we have created a people's movement called "Climate Literacy".

"Climate literacy" means the need to be self-sufficient in climate while living in the Indian subcontinent. Recognizing that all farmers and citizens need to be self-sufficient in climate, the main objective is to create climate awareness among the citizens.

We have been running this project uninterruptedly for the last 4-5 years and this concept is benefiting 1 crore farmers and citizens today.

We want to build an army of 1 lakh climate literate farmers like us in Maharashtra in the near future.

For this we use social media tools like Facebook, WhatsApp, web pages, YouTube channels. Also, uses radio stations, TV channels and other media available in written form. We are also expected to cooperate in this movement to prevent the damage caused by climate change.

More and more farmers should be involved in this movement. So that this movement becomes very widespread and the world has to take notice of it. Therefore, the government will wake up and from now on the weather forecast will be available from government and private agencies in a language that the common man can understand.

If we have in-depth knowledge about the weather, we can reduce the level of damage by facing the coming crisis.
 
for more information: https://www.facebook.com/groups/140626719971530/?ref=share

Read More

support