To preserve the right to free education for all SSC students | Milaap
This is a supporting campaign. Contributions made to this campaign will go towards the main campaign.
To preserve the right to free education for all SSC students in MH
  • Deepak

    Created by

    Deepak Salgare
  • Vo

    This fundraiser will benefit

    Vowels of the People Association

    from Pune, Maharashtra

"आई, करणच्या अण्णांनी त्याला ऑनलाइन शिकण्याचं ऍप् विकत घेऊन दिलं. तो रोज मोबाईल वर अभ्यास करतोय. दाखव म्हटलं तर दाखवत पण नाही."
"आपण पण घेऊ. किती पैसे लागतात त्याला?"
"40,000 रुपये म्हटला तो."
"काय? आपल्याला नाही जमायचं बाळा.."
"मग कसं शिकू? कसा करू अभ्यास?"


अशी चर्चा आज घरोघरी होताना दिसत आहे. 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. ज्यांना परवडू शकते असे पालक ऑनलाइन शिक्षणाचे महागडे शैक्षणिक ऐप्स विकत घेत आहेत व आपल्या पाल्यांचे शिक्षण सुरू ठेवत आहेत, पण सामान्य विद्यार्थ्यांना परवडू शकेल असे ऐप्स उपलब्ध नाही आहेत. परिणामी सामान्य घरातील गरीब विद्यार्थी स्पर्धेत कायमचे मागे पडतील.

करियरच्या  दृष्टीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष आहे, त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण मोफत उपलब्ध व्हावे, जीवनाच्या स्पर्धेत त्यांना बरोबरीची संधी मिळावी, बाजारातील विविध ऐप्सनी पालकांची चालवलेली आर्थिक लूट थांबावी यासाठी आम्ही VSchool (व्ही स्कूल) या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे महाराष्ट्रातील इयत्ता दहावीचे १५,००,००० (पंधरा लाख) विद्यार्थी मोफत ऑनलाइन अभ्यास करू शकतील. 

गेल्या 12 दिवसांमध्ये या प्लॅटफॉर्मला सुमारे 9.5 लाख पेज व्हीव मिळाले आहेत. प्लॅटफॉर्मचा खर्च प्रती विद्यार्थी प्रती वर्ष खर्च:  रु.२.५/- (अडीज रुपये) इतका आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प मोफत राहावा यासाठी 38 लाख रुपये मदतीची गरज आहे. तुम्ही देणगी दिलेल्या प्रत्येक अडीज रुपयातून एका विद्यार्थ्याला ऑनलाइन शिक्षणाची साधने वर्षभर उपलब्ध होतील.
प्लॅटफॉर्मची लिंक – ssc.vopa.in
फेसबुक पेजची लिंक 
महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार यासाठी आवाहन करत आहेत.
व्हिडीओ लिंक:
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते सागर देशमुख
२. दिल दोस्ती दुनियादारी फेम आपला आवडता आशू - पुष्कराज चिरपुटकर
३. सावित्री-जोती, माझी शाळा फेम प्रसिद्ध अभिनेते ओंकार गोवर्धन
४. सर्वानाच सुपरिचित अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष

अनेक वृत्तपत्रांनी या प्रकल्पाची दखल घेतली आहे:
१. TV 9 मराठी
२. ABP Live 
परिणाम:
  • या प्लॅटफॉर्मद्वारे महाराष्ट्रातील इयत्ता दहावीचे पंधरा लाख विद्यार्थी मोफत अभ्यास करू शकतील.
  • विद्यार्थ्यानी सोडविलेल्या ऑनलाईन परीक्षांमधून त्यांना अभ्यासात किती फायदा होतो आहे हे समजू शकेल.
  • लॉकडाऊन संपल्यानंतर देखील विद्यार्थी आणि शिक्षक यांना हा प्लॅटफॉर्म खूप उपयुक्त राहील.
मोबाईलची उपलब्धता आणि इंटरनेट स्पीड:
  • लॉगीन आणि इंस्टॉल करण्याची गरज नसल्याने एकाच मोबाईलचा वापर करून एकापेक्षा अधिक जण अभ्यास करू शकतील.
  • कमीत कमी इंटरनेट स्पीड वर पण चालेल असा प्लॅटफॉर्म
  • स्क्रीन टाईम कमी कसा राहील याचा विचार केल्याने प्रत्यक्ष मोबाईलची गरज कमी लागेल.
  • वापरायला अगदी सोप्पा आहे. (संपूर्ण धडा एकाच पेजवर स्क्रोल करून पाहता येतो.
प्लॅटफॉर्म बद्दल डेमो 

शैक्षणिक गुणवत्ता:
  • जिल्हा परिषदेद्वारे नेमलेल्या तज्ज्ञ शिक्षकांनी अभ्यासक्रम बनवला आहे
  • स्क्रीन टाईम कमी करून, अभ्यास दैनंदिन जीवनाशी जोडला आहे, अनुभवातून शिकणे व्हावे अशी रचना केली आहे. 
  • फक्त व्हिडीओचा भडीमार नाही, त्यासोबत इमेज, gif इमेज, सिम्युलेशन यांचा वापर
  • प्रत्येक पाठात अनेक ऑनलाईन परीक्षांचा समावेश, बरोबर उत्तरे आणि अभिप्राय लगेच समजेल
  • बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने वही, पेन, पुस्तके यांचा वापर करून प्रश्नांचा सराव
  • शाळा व शिक्षक यांना सक्रीय भूमिका, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र मिळून अभ्यास सुरू ठेवतील, त्यासाठी शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण/ मार्गदर्शन देखील होत आहे. 
इतर महत्त्वाचे:
  • लॉकडाऊन संपल्या नंतर देखील विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठी देखील हे उपयुक्त आहे.
  • आपण सर्व विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आणि वापराचा डेटा एका ठिकाणी पाहू शकू, शाळांना तो एकत्र दिसेल.
  • विद्यार्थ्यानी सोडविलेल्या ऑनलाईन परीक्षा व अभिप्रायामधून यात अधिक सुधारणा होत राहील.
  • आपल्या गरजेनुसार याचा वापर करून घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना आणि शिक्षकांना आहे.
  • शिक्षकांचा समुदाय ह्यावरील शैक्षणिक साहित्य निर्मितीत मदत करत आहे
आवाहन:
बीडचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
हा प्रकल्प सुरवातीला बीड जिल्ह्याकरिता सुरु केला होता. याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि सर्वांची गरज पाहता आम्ही महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपलब्ध करून देत आहोत.
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म चालवण्याचा वार्षिक खर्च रु. ३८,००,०००/- (अडतीस लाख) इतका आहे.
प्रती विद्यार्थी प्रती वर्ष खर्च:  रु.२.५/- (अडीज रुपये)
(तुलनात्मक माहितीसाठी - बाजारातील ऑनलाइन शिक्षणाची इतर ऐप्सची प्रती विद्यार्थी फिस 25,000 पासून 70,000 रुपये प्रती वर्ष इतकी आहे.)

वार्षिक खर्चाचा साधारण तपशील:
18 Lakh - Website development, maintenance, cloud hosting, security, etc.
16 Lakh - Educational content development, teacher training, analytics services to schools, etc.
1 Lakh - Awareness campaign
3 Lakh - Travel, admin, software, etc.

तुम्ही मदत केलेल्या प्रत्येक अडीज रुपयातून एका विद्यार्थ्याला ऑनलाइन शिक्षणाची साधने वर्षभर उपलब्ध होतील. आम्ही आपणास विनंती करतो की आपण जास्तीत जास्त देणगी देऊन विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यास मदत करावी.

वोपा बद्दल:
Vowels of the People Association (VOPA) ही ना- नफा तत्त्वावर चालणारी नोंदणीकृत सेक्शन ८ कंपनी आहे.
मागील दोन वर्षांपासून VOPA ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे काम करत आहे. शाळेतील शिकणे- शिकविणे आनंददायी, अर्थपूर्ण आणि अधिक प्रभावी व्हावे यासाठी आम्ही शिक्षकांचा कौशल्य विकास आणि शाळा व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे काम करतो.
वेबसाईट - https://vopa.in
फेसबुक- https://www.facebook.com/contact.vopa
युट्युब - https://www.youtube.com/channel/UCjLnfmyuCWK5CXD1n1XD6ig/featured

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support